मांजर आवडणाऱ्यांना इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची सवय आपोआप लागते!
जसं माणसांमध्ये वेगवेगळे स्वभाव असतात, तसेच मांजरांमध्येही आढळतात. सगळ्या मांजरांशी सारखंच वागलं तरी काही मांजरं अधिक प्रेमळ किंवा मैत्री करणारी असतात, तर काही तुसडी असतात. काही गरीब असतात, तर बहुतेक जण बिलंदर असतात. पण सर्वसामान्यपणे जे असं समजलं जातं की, मांजर हे लबाड आणि स्वार्थी असतं. ते काही पूर्णत: खरं नाही. मांजर हे कुत्र्यासारखं स्वामीभक्त नसतं अशीही काहीजणांची तक्रार असते.......