झुंडशाहीच्या बळावर कोणी भयभीत करत असेल, तर आपण नमतं घेऊन टीकेचे धनी होणार का?
हे सगळंच फार दुर्दैवी चित्र आहे. पण याला जबाबदारही आपणच आहोत. साध्यासाध्या, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतो आपण. जशास तसे म्हणत, अन्यायाला अन्यायाचं, सूडाला सूडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थनामंदिराचं, एका जातीला दुसरीचं .......