महाडच्या ‘चवदार तळे सत्याग्रहा’तील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रमुख सहकारी सुरबानाना टिपणीस यांच्याविषयी...
डॉ. आंबेडकर जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा ते गोविंद निवासमध्ये मुक्कामाला असत. डॉ. आंबेडकरांनी १९५२मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुरबानाना त्यांच्या प्रचारासाठी मुंबईला गेले होते. विसाव्या शतकातील मानव मुक्तीचा मोठा लढा डॉ. आंबेडकरांनी उभा केला. या सर्व प्रवासात, चळवळीत, मंथनात त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, अशा अनेक शिलेदारांची, निकटवर्तीय नेत्यांची, कार्यकर्त्यांची चरित्रं यायला हवीत.......