आजोबांना (म. गांधींना) न्याय मिळवण्यासाठी शांतीपूर्ण मार्ग शोधावे लागले!
महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांना वयाच्या सहाव्या वर्षी काही दिवस आणि वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अठरा महिने आजोबांचा सहवास मिळाला. त्या काळात त्यांच्यावर आजोबांचा जो प्रभाव पडला, त्यावर आधारित त्यांनी २००३मध्ये ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. त्याचा मराठी अनुवाद ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने सोनाली नवांगुळ यांनी केला आहे.......