धावून आयुष्य आरोग्यदायी आणि संपन्न करता येतं, हे सांगणारी दोन उपयुक्त व प्रेरणादायी पुस्तकं…
सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आपण अधिकाधिक भौतिक सोयी-सुविधांमध्ये अडकत आहोत आणि शारीरिक, मानसिक व आत्मिकदृष्ट्या समृद्ध आयुष्यापासून दूर जात आहोत. अशा काळात नैसर्गिक, स्वाभाविक आणि संपन्न आयुष्याच्या मार्गावर येण्यासाठी अमित शेठ यांचं ‘डेअर टू रन’ हे इंग्रजी आणि डॉ. संदीप काटे यांचं ‘म-मॅरेथॉनचा’ हे मराठी, ही दोन पुस्तकं नक्कीच प्रेरणादायी ठरतील.......