केंद्र सरकारने ‘सिस्टिम’ नावाच्या घटकावर कबजा मिळवताना, तिचे अस्तित्वच नष्ट करून टाकले आहे...
गेल्या सात वर्षांपासून केंद्र सरकारने ‘सिस्टिम’वर कबजा मिळवताना, तिचे अस्तित्वच नष्ट करून टाकले आहे. असे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे ना लोकशाहीसाठी आवश्यक संस्थात्मक व्यवस्थेचे आकलन आहे, ना ती उभारण्याचे सामर्थ्य आहे. सरकारला केवळ सत्तेचे केंद्रीकरण करण्यास हातभार लावणाऱ्या व्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे लोकशाही परिघातल्या इतरही संस्था कमकुवत होत जाणे स्वाभाविक आहे. आजच्या घडीला नेमके हेच घडते आहे.......