नकळत्या वयात मुलांच्या हातून झालेल्या चुकांना क्षमा केली जात नाही, सरसकट त्यांच्यावर ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारला जातो आणि परतीच्या वाटा बंद केल्या जातात
या मुलांकडे बघण्याचा समाजाचा, पोलिसांचा, न्याययंत्रणेचा दृष्टिकोन खूपच नकारात्मक आहे. खरं तर आपण आणि आपल्यातलेच काही जण त्यांना जे देतोय, तेच ही मुलं आपल्याला परत करतायेत आणि तरीही बोट त्यांच्यावर रोखण्यात आपण पुढे आहोत. या मुलांचा भवताल पूर्णपणे बदलणं ही लगेचच होणारी गोष्ट नाही; पण त्यांना सन्मानानं जगण्यासाठी जरूर ती साधनं देणं आणि कायद्याचं संरक्षण पुरवून सक्षम करणं ही तर करता येण्यासारखी गोष्ट आहे.......