संविधान को फुटबॉल का गेम मत बनाईये
संविधानाची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही, पण ती चिकित्सक वृत्ती सर्व ठिकाणी वापरण्याची संधी असणं गरजेचं आहे. संविधानात बदल किंवा संविधान-बदल हा मुद्दा चिकित्सेच्या नावाखाली या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याकारणानं खालील बाबी उपस्थित करण्याची गरज आहे. जर संविधान हे चिकित्सेला खुलं असावं असं वाटत असेल, तर ‘बायबल’, ‘कुराण’, ‘गीता’, ‘मनुस्मृती’ यांचीही काळानुरूप चिकित्सा व्हायला काय हरकत आहे?.......