‘निवडणूक रोखे’ हे भाजपच्या राजकीय भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक आहे, तशीच ती भारतीय राजकारणाच्या अध:पतनाची परिसीमाही आहे!
नुसते हे टोक बाहेर पडल्यावर भाजप नेत्यांनी मारलेल्या कोलांटउड्या ही राजकीय निर्लज्जपणाची परिसीमा आहे. ‘काळा पैसा बाहेर काढण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे’, ‘निवडणूक रोखे चेकने घेतले जातात, म्हणजे तो पांढरा पैसा असतो’, ‘तुलनेत काँग्रेसला जास्त पैसा मिळाला आहे’, ते ‘हा एक प्रामाणिक प्रयोग होता, असे प्रयोग फसू शकतात’, अशा कोलांट्या भाजप-संघनेत्यांनी मारल्या. भारतीय राजकारणाचे हे अधःपतन आपल्याला कुठे नेणार.......