१९४५-१९४६च्या निवडणुकांचा काळ काँग्रेस आणि अर्थात सरदार पटेलांसाठी कसोटीचा होता. पद्धतशीरपणे नियोजन करत त्यांनी हे आव्हान अंशतः पेलले…
हिंदू मतदार काँग्रेसच्या बाजूने आहेत, हे निकालांवरून सिद्ध झाले, ही पक्षासाठी जमेची बाजू होती. काँग्रेसने आणि त्याच्या नेत्यांनी मुस्लीम लीगविरोधी मुस्लीम शक्तींना संघटित करायचा प्रयत्न केला खरा, पण मुस्लीम मतदारांनी भरभरून लीगलाच पाठिंबा दिला. या निकालांद्वारे पुढील घटना-घडामोडींचे सूचनच झाले, असे आज मागे वळून पाहताना म्हणता येते.......