‘प.वा.’: समतावादी विचारांची बैठक असलेला वैचारिक देवाणघेवाणीचा मुक्त विचारमंच!
‘प.वा.’ सुरू झाला, तेव्हा उजवा विचार अत्यंत जोमात होता. १९९१मध्ये सुरू झालेलं खाजगीकरणाचं वारं आणि १९९२मधे बाबरी मशिदीच्या पतनानंतर सुरू झालेलं जमातवादाचं वारं १९९८मध्ये अधिक स्थैर्यानं, आत्मविश्वासानं वाहू लागलेलं होतं. खरं तर या परिस्थितीनेच ‘प.वा.’ला सर्व अडचणींच्या विरोधात तगून राहण्याचं बळ दिलं आहे. ‘प.वा.’ची वाट तोवर सरणार नाही, जोवर समतेच्या राष्ट्रीय महामार्गावर आपला प्रवास सुरू होणार नाही.......