लेखन कितीही चैतन्याने भारलेले असले किंवा आश्वासक असले, तरीही ते केवळ लढाया आणि वादविवादांबद्दल असू शकत नाही!
मी त्या काळाबद्दल बोलतोय, जेव्हा वसाहतीकरणाच्या मोहिमेने संपूर्ण प्रदेशाला व्यापून टाकले नव्हते आणि वसाहतवादी राजवटीची अगदीच अवनती झाली नव्हती. आमच्या नंतरच्या पिढीत वसाहतकालानंतर तयार झालेले त्यांचे स्वत:चे भ्रम आणि भ्रमनिरास होते. आणि कदाचित वसाहतवादाशी आलेल्या संपर्कामुळे आमचे जीवन कसे बदलले, ते त्यांनी स्पष्टपणे किंवा पुरेसे सखोल समजून घेतले नाही.......