दुर्दैवाने आपली विद्यापीठे आता संकुचित आणि झापडबंद अवस्थेत रूपांतरित होत आहेत...
उच्च शिक्षण संस्था आता मनाच्या भारतीयीकरणाची यंत्रे बनली आहेत. एकरूपतेच्या आवाहनाचे हे एक लोकप्रिय आवाहन आहे. तरुणांना राष्ट्रवादी बनवण्याचा विचारही फारच मोहक आहे. परंतु आपणाला माहीत आहे की, आपण एकाच वेळी जागतिक दर्जाचे आणि राष्ट्रवादी होऊ शकत नाही. जगातील कोणतेही महान विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद रुजवण्याचा प्रयत्न करत नाही.......