अरुणा रॉय : शेतकरी, मजूर व कष्टकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणाऱ्या नेत्या
अरुणा रॉय यांनी शेतकरी, मजूर व कष्टकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली, त्याकरता लढण्यासाठी सजग केलं. माहिती मिळणं हा आपला अधिकार आहे, हे त्यांनी जनसामान्यांना प्रत्यक्ष कामातून पटवून दिलं. बदल घडवायचा असेल तर माहिती मिळवली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, हा संदेश त्यांच्या आंदोलनांनी लोकांच्या मनावर बिंबवला. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी अरुणा रॉय यांना मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला.......