अन्यायाच्या विरोधातली माझी लढाई अजून संपलेली नाही. आताशी कुठे एक ठाणं काबीज केलंय... लढाई अजूनही सुरूच आहे...
हे एका विशिष्ट कालमर्यादेतील कथन आहे आणि हा कालखंड आहे फक्त २३ महिन्यांचा (फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२२). म्हणजे जेमतेम दोन वर्षांचा काळ; पण माझ्या संपूर्ण आयुष्यालाही पुरून उरेल असा हा कालखंड आहे, म्हणूनच मी माझं हे आत्मकथन लिहिलं आहे. या जेमतेम दोन वर्षांच्या काळात मी ज्या परिस्थितीला सामोरा गेलो, तो अनुभव सांगण्याचं धाडस मी केलंय.......