‘देशभक्ती’ कशाला म्हणतात, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते!
आज परिस्थिती अशी आहे की, जर स्वामी विवेकानंद आज जिवंत असते तर त्यांचा उपदेश ऐकून हिंदू कट्टरतावादाच्या प्रचारकांनी त्यांना ‘छद्म धर्मनिरपेक्षवादी’, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘हिंदूविरोधी’ ठरवले असते आणि त्यांना ‘पाकिस्तानात जाण्या’चाही सल्ला दिला असता. कारण ज्याप्रमाणे त्यांना गांधी, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांना समजून घेणे शक्य नाही, त्याचप्रमाणे विवेकानंदांनाही समजून घेणे शक्य नाही, तर अशक्य आहे.......