सत्यजित राय यांनी नव्या ध्वनीची आकर्षक वळणे रेखून आपली चित्रसांगीतिक ओळख पटवण्याचा ध्यास घेतला, हेच खरे त्यांच्या संगीताचे मूलतत्त्व म्हणता येईल!
वैचारिक अंगाला कलानिर्मितीत स्थान नाही, असे सुदैवाने राय यांचे मत नव्हते. याच कारणाने चित्रपटात संगीताने काय कार्य करावे आणि तसे (च) का, या प्रश्नांविषयी त्यांची स्वतःची भूमिका विकसित होत गेली. ही भूमिका चूक की बरोबर, कशीही असो, ती त्यांची स्वतःची होती, हे निश्चित. ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाच्या संगीतातून दिसणारी त्यांची भूमिका चित्रसंगीताला मान्यता देणारी असली तरी त्यांच्या एकंदर दृष्टिकोनाशी विसंगत होती का.......