कारगिल आणि बादल
युद्धात मरण्या-मारण्याचा विषय निघताच त्याचं रक्त उसळलं व तापल्या आवाजात तो म्हणाला, “पाकिस्तान्यांनी हल्ला केला ना, तर आम्ही त्यांना खतम करू.” मी त्याला विचारलं, “तुझ्यावर हल्ला करणारे पाकिस्तानी कोण आहेत? नोकरीच्या शोधात, पोट भरायला, घरी पैसे पाठवण्यासाठी सैन्यात सामील झालेली तुझ्यासारखीच माणसं आहेत ना ती? ते स्वत:हून तुझ्यावर हल्ला करतात का? किंवा तुही त्यांच्यावर आपणहून हल्ला करतोस का?”.......