सर्वच राजकीय कार्यकर्ते चारित्र्यसंपन्न असतील, तर चारित्र्यहननाचा प्रश्नच उदभवणार नाही...
एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, चारित्र्याचे कधीच ‘हनन’ होत नाही; आणि ज्या चारित्र्याचे हनन होते, त्याला चारित्र्य म्हणत नाहीत. ही वस्तुस्थितीच आपल्या राजकीय नेत्यांचे चारित्र्य ढिले झाले असल्याचे सूचित करते. ‘चारित्र्यहनन’ हा रोग नसून ते रोगाचे बाह्य लक्षण आहे. तेव्हा आमच्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चारित्र्यसंपन्नता दुर्मीळ होत चालली आहे, हे प्रथम आपण प्रांजळपणे मान्य करू या.......