‘सोलोकोरस’ ही इतरांच्या दुःखाने ज्यांचे मन भरून येते आणि ते त्यांच्या उक्ती-कृतीतून झिरपत राहते, अशा लोकांशी संवाद साधण्याची धडपड आहे...
चांगुलपणाचा काफीला तयार व्हावा आणि आपल्या आजूबाजूला दिसणारा घनदाट अंधार थोडा तरी विरळ करावा, यासाठीची ही एक धडपड आहे. आपणही त्यातला एक भाग होण्यासाठी, आपल्यातलं माणूसपण जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या आतल्या, गोठत चाललेल्या संवेदनशीलतेला जागं करण्यासाठी, माणूसपणाच्या निकषावर आपण नेमके कुठे आहोत, हे तपासून पाहण्यासाठी आणि संवादाचा पूल अव्याहत चालू ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी, ‘सोलोकोरस’ पाहायला हवा!.......