करोनाच्या काळात मला एका झोपडपट्टीत जावं लागलं, तेव्हा तिथली परिस्थिती पाहून मनाचा थरकाप उडाला.
मुंबईनं काय अनुभवलं नाही? १९९२-९३ची दंगल, २००५चा महापूर, २००८चा दहशतवादी हल्ला. आपत्ती कितीही मोठी असू देत, एकदा घरी पोहोचलो की, सुटलो असं वाटतं. पण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीनं राहणाऱ्या लोकांच्या या समजाला करोनाने पूर्णपणे छेद दिलाय. ज्या घरांत ते लहानाचे मोठे झाले, जी घरं त्यांना कोणत्याही मोठ्या संकटात आजवर आश्वासक वाटली, त्याच घरांचं त्यांना आता भय वाटू लागलंय. तिथं त्यांचा श्वास कोंडू लागलाय.......