सध्याच्या महाराष्ट्रातील वाचाळ लोकप्रतिनिधींचे गचाळ, बेपर्वा आणि बेजबाबदार वर्तन सामाजिक पर्यावरण कलुषित करणारे आहे
पुढारी, नेते आणि लोकप्रतिनिधी जर बेपर्वा आणि बेजबाबदार झाले असतील, तर जनतेने अधिक गंभीरपणे, कृतिशीलतेने लोकशाही विचारांच्या दिशेने समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी वाटचाल करावयाची हवी. पुरोगामी आणि प्रगतिशील ही बिरुदे पुसली जाण्याआधी महाराष्ट्राने सावध होऊन विचारशील, कृतिशील होण्याची गरज आहे.......