झारखंड विधानसभा निवडणुकीत मोदी-शहांच्या झंझावती प्रचारसभांचाही फायदा झाला नाही!
झारखंड या राज्याच्या विधानसभेचे निकाल मागच्या सोमवारी (२३ डिसेंबर) जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव झाला. मोदी-शहांनी झारखंडमध्ये एकूण १८ प्रचारसभा घेतल्या. त्यातून त्यांनी ८१ पैकी तब्बल ६० मतदारसंघ कव्हर केले. त्यापैकी भाजप केवळ २० जागा जिंकू शकला. या दोघांच्या सभांच्या यशाची टक्केवारी ३५ टक्के राहिली. काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सहा सभा घेतल्या, तर २४ मतदारसंघ कव्हर केले.......