राजकीय व्यवस्थेपासून स्वत:ला कसोशीनं अलिप्त ठेवू बघणाऱ्या समाजाची मूल्यं पोकळ आणि कालबाह्य होत असतात!
आपल्या मध्यमवर्गीय मूल्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक नामशेष होत जाणाऱ्या आदिवासींबद्दल आपलेपणा वाटत नाही. आपल्या शहर-महानगरांतून चिमणी, गिधाडं कायमची हद्दपार झाली, याबाबत आपली मूल्यं सुस्त असतात. आपल्या घरात/फ्लॅटसमोर किंवा गॅलरीत किंवा ग्रिलमधल्या असणाऱ्या टीचभर जागांत माती/प्लॅस्टिकच्या कुंड्यांतून रोपटी लावली की, आपली मूल्यं आपल्याला पर्यावरणवादी आणि आपल्याला सौंदर्यदृष्टी असल्याचं समाधान देतात.......