ज्याचे शब्द सोन्यासारखे अमूल्य आहेत, जो माणूस सोनेरी शब्दांचा आहे, तो ‘सुभाष’...
जो सतत घालून पाडून बोलतो, घाणेरडे बोलतो, कुजके नासके बोलतो, खवचटपणे बोलतो, त्याला आपण तो ‘फाटक्या तोंडाचा’ आहे, ‘शिवराळ’ आहे, त्याच्या तोंडातून ‘गटारगंगा’ वाहते, असे म्हणतो. आणि जो मधुर वाणी वापरतो, ज्याच्या बोलण्याने, वाणीने मने दुखावत नाहीत तर सुखावतात, ज्याचे शब्द बहुमोलाचे आहेत, नव्हे, सोन्यासारखे अमूल्य आहेत, त्याला आपण ‘सुभाष’ म्हणतो.......