श्रीचक्रधरांची दिवाळी अर्थात ‘लीळाचरित्रा’त आलेली दिन दिन दिवाळी
श्रीचक्रधरांचा परिभ्रमण काळ आणि दिवाळीचा मुहूर्त या सगळ्यांची संगती लावून त्यांच्या दिवाळीचं वर्ष आणि ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार प्रथम दिवाळी शके ११८७ची पैठण येथील भोगनारायणाच्या मठात, दुसरी शके ११८८ची सिन्नरला, तिसरी शके ११८९ बीड येथे, चौथी शके ११९०ची जालना येथे, पाचवी शके ११९१ डोमेग्राम येथे, सहावी शके ११९२ नेवासा येथे, सातवी शके ११९३ची पैठण येथे आणि आठवी शके ११९४ची आंबा (सेकटा) येथे केली.......