माणसाच्या हस्तक्षेपामुळे कुत्र्यांमध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त जाती तयार झाल्या!
प्रत्येक जातीचा किंवा breedचा कुत्रा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. Selective breeding हे जरी त्याचं कारण असलं तरी पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही प्राण्यात एवढी विविधता आढळत नाही.या वैविध्याची सुरुवात कुत्र्याच्या जन्मासारखी फार पूर्वीच झाली. गाई-गुरं दुधासाठी, शेतीच्या कामासाठी व मांसासाठी, शेळ्या-मेंढ्या मांस, लोकर व दुधासाठी, कोंबड्या व डुकरं मांसासाठी वापरले जातात, पण कुत्रा यापैकी कोणत्याच कामाला येत नाही.......