का असते असे किशोरवयीन मुलांचे वर्तन? का त्यांना वेगळे स्टंट करावेसे वाटतात? ...तर त्याची काही मानसिक, शारीरिक कारणे आहेत
मुलांचा आत्मसन्मान जागृत झाला तर ती आपल्या समस्येला धीटपणे सामोरी जाऊ शकतात. लाज, श्रम, पश्चताप या अपराधी भावभावनांना मूठमाती देऊन संकटाशी मुकाबला करू शकतात. आणि आपल्या भवितव्याची सूत्रे समर्थपणे सांभाळू शकतात. ज्या वेळी त्यांना समस्या भेडसावू लागतात, त्या वेळी मोकळे, दिलासा देणारे वातावरण निर्माण केले, त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून जबाबदारी सोपवली, तर स्वत:च्या समस्या ते स्वतःच सोडवण्यात यशस्वी होतात.......