ऐन करोनाकहरातली अमेरिका नावाची अतर्क्य महासत्ता… (पूर्वार्ध)
जिथं आशेचा किरण दाखवण्याकरता वैज्ञानिक सत्याचा आसरा घेतला जात नाही, तिथं आपोआपच भीतीचं राजकारण केलं जात असतं. तसंच जिथं सगळ्या वैज्ञानिक दृष्टीकोनावर शंका घेण्यात धन्यता मानली जाते, तिथं कल्पनांचं पेवच जास्त फुटत असतं. मग अगम्य व अस्पष्ट तर्कशात्राच्या जोरावर, कुठल्या तरी वेडात हे वीर घराबाहेर दौडत सुटतात, स्वतःच्या व दुसऱ्यांच्या जिवाची पर्वा न करता.......