‘लोकमान्य ते महात्मा’ : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्वाचन
तुकाराम दर्शन एककेंद्री होतं. ‘लोकमान्य ते महात्मा’ द्विकेंद्री आहे. म्हणून अधिक गुंतागुंतीचे, कॉम्प्लेक्स आहे. या ग्रंथात टिळक आणि गांधी आपल्याला फार ठळकपणे भेटतातच, पण त्यांना जोडणारे या काळातले अक्षरश: शेकडो नेते-कार्यकर्ते त्यात डोकावतात. खरं तर एका नव्या, आधुनिक, लोकशाही देशाच्या जन्मकळा, बाळंतकळा सोसण्याचा तो संधिकाळ. आनंदाचा, तेवढाच वेदनेचा.......