रूढ आणि क्लिशे समजुतींना ‘मायलेकी-बापलेकी’तले अनुभव जोरदार धक्के देतात!
हा विषय इतका सदाबहार आहे की, या नव्या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. संपादक द्व्याला या विषयाची मनापासून आस्था आहे आणि पुस्तकातून अनेक पैलू समोर यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्नही केले आहेत, हे जाणवतं. ‘मायलेकी’ विभागात नऊ आयांनी मुलीवर लिहिलं आहे, तर ‘बाप-लेकी’मध्ये आठ बापांनी! यातले बरेच आई-बाबा लेखन, पत्रकारिता अशा क्षेत्रांशी संबधित आहेत. त्यामुळेच की काय, त्यांचे अनुभव अगदी वाचनीय शब्दांत आणि शैलीत उतरले आहेत.......