धर्माच्या प्रतीकावरून भडकणारे वा भडकवणारे महापुरुषांची मानहानी का बरे सहन करतात? त्यांच्या सहनशीलतेचा नेमका रंग ओळखायचा कसा?
स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेणारे लोक आणि त्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या संघटना व राजकीय पक्ष यांनी ‘पठाण’विरोधी भूमिका घेतली आहे. विखार, हिंसा, असहिष्णूता, दहशत, स्त्रियांचे वस्तुकरण, महापुरुषांची बदनामी, हे कोणत्या धर्माचे तत्त्व असू शकते? थोडक्यात, ते फक्त आणि फक्त आपला छुपा हेतू साध्य करत असतात. समाज पेटवून आपली भाकरी भाजून घेणे, हाच त्यांचा धंदा आणि मनसुबा असतो.......