‘देहाचिये गुंती’ : ‘कामप्रेरणे’कडे बघण्याची नवी दृष्टी देणारी आध्यात्मिक बाबाच्या जीवनावरील कादंबरी
अलीकडच्या काळात आध्यात्मिक बुवा-बाबांचं प्रस्थ वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी महत्त्वाची ठरते. अध्यात्माच्या नावाखाली गुरू-बाबांचं वाढतं प्रस्थ आणि लोकांची एका अर्थानं फसवणूक, हे समाज-वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते. प्रारंभीच ‘गुरुजींची हत्या का झाली?’ ही गोष्ट कादंबरीमध्ये कुतूहल वाढवते. कम्यून, तिथली शिस्त, तिथले लहानसहान संदर्भ, बारकाईनं केलेलं मनोविश्लेषण यामुळे कादंबरी गुंतवून ठेवते. .......