सद्यःस्थितीमध्ये आपला देश नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे!
या देशाचा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोककल्याणकारी, स्वातंत्र्यवादी, सामाजिक न्यायवादी असा चेहरा कायम ठेवण्याची गरज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने निर्माण झालेली आहे. या लोकशाहीचे आपण जर निग्रहपूर्वक जतन केले नाही, तर आपली देशस्थिती व समाजस्थिती दुभंगून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर या देशाची लोकशाही मूळ स्वरूपात कणखरपणे व ताठपणे कायम ठेवावी लागेल........