झुंडशाहीला सामोरं जात; धमक्या, ट्रोल्सचा हल्ला, हे सारं पचवून तो ‘नमष्कार, मैं भी रविश कुमार...’ असं म्हणत स्क्रीनवर हजर होतो...
आपल्या ‘प्राईम टाइम’मध्ये सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन उभा राहणारा हा सच्चा पत्रकार सातत्यानं झुंडशाहीला सामोरं जातो. ‘हां, मुझेभी डर लगता है!’ असं प्रांजळपणे सांगत प्रयत्नपूर्वक त्या भीतीवर मात करत धैर्य एकवटणारा रवीश कुमार ‘डरा हुवा पत्रकार, मरा हुवा लोकतंत्र पैदा करता है’ असं म्हणतो, तेव्हा तो एका अर्थानं लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करणारा आशेचा दिवा बनून उजेड पेरू पाहत असतो!.......