आपल्याकडे कित्येक वर्षांपासून तणावरहित, आनंददायी सर्जनशील लेखनाला आधार देणाऱ्या परीक्षांचा दुष्काळ पडलेला आहे!
आजची शिक्षणव्यवस्था, परीक्षापद्धती ही इवान इलिचने म्हटल्याप्रमाणे खरोखरच आपल्या समाजव्यवस्थेचेच प्रतिबिंब आहे. विषमतेने भरलेली, सफलतेची, यशाची उथळ समीकरणे स्वीकारणारी, विचारक्षमता, संवेदनशीलता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून संकुचित दृष्टीकोनातून ज्ञानाचा, शिक्षणाचा विचार करणारी आणि मुलामुलींचे ‘मूलपण’ हरवून टाकणारी व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, असे पर्यायी मार्ग शोधावे लागतील.......