संजय भागवत : उमदा, निरलस मित्र आणि मिश्किलही!
आपण एखादे काम घेऊन त्याच्याकडे गेलो तर स्वत:चे सुरू असलेले काम बाजूला ठेवून तो आपल्याला मदत करायला तत्पर असे. नि:स्वार्थ मदत करणे आणि आपण नामानिराळे राहणे, हा संजयचा मोठा गुण होता. तो मोजकेच पण मार्मिक बोलत असे. संजय ‘good listener’ होता. तसाच मिश्किलही! संध्याकाळी पाच वाजले की, संजय प्रेसच्या मागे असलेल्या गोरेगावकर लेनमध्ये आपल्यापेक्षा लहान मित्रांबरोबर क्रिकेट किवा व्हॉलिबाल खेळायला जाई.......