रत्नाकर मतकरी : लेखक कसा असावा, त्याने काय करावे याविषयी अवाक्षरही न उच्चारता ज्यांनी मला खूप काही शिकवलं, असा हा फार मोठा लेखक, त्याहून मोठा माणूस!
मतकरींनी या दोन्ही गोष्टी आयुष्यभर जीवापाड जपल्या. लेखणी, म्हणजे लेखनाशी असणारी त्यांची बांधीलकी आणि लेखक व माणूस (या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसतातच) असणारे शील – आपण ज्या समाजात, पर्यावरणात जगतो, त्याबद्दल असणारे आपले कर्तव्य, बांधीलकी, ते देणे विविध पद्धतींनी देण्याची सहज ऊर्मी. या दोन्ही गोष्टी जपल्यामुळे रत्नाकर मतकरी नावाचा कवी आयुष्याची, लेखनाची दीर्घ कविता तालासुरात रचू शकला.......