पाब्लो पिकासो यांचे ‘गेर्नीका’ आणि साल्वादोर दाली यांचे ‘पर्सिस्टन्स ऑफ मेमरी’ : जुलमी व पाशवी शक्तीचे प्रभावी प्रतीक आणि काळ व अवकाश या संकल्पनांचा नवा व अनोखा अर्थ

या पुस्तकात प्रामुख्याने कलेविषयीचे लेख आहेत. मात्र केवळ कलाविचार असे त्यांचे स्वरूप नाही, तर ज्या राजकीय-सामाजिक पर्यावरणात कला आकार घेते, साकार होते, तो काळही पाटकरांनी उभा केलेला आहे. कलेला राजकीय-सामजिक संदर्भ असतातच. त्यांचा अन्वयर्थक उलगडा करत पाटकर विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान यांचेही दाखले उचित ठिकाणी देतात. ‘कलेचा सामाजिक भाष्यकार’ या भूमिकेतूनच पाटकरांनी हे लेखन केलेलं आहे.......