जॉर्ज गॅलवेचा विजय अनेकांना नव्या युगाची नांदीसमान भासतो आहे. जुन्या स्थितीवादी राजकारणाला विटलेल्या आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या जनतेला तोच एक आशेचा किरण दिसतोय...

जॉर्ज गॅलवे हे नाव भारतात कुणाला ठाऊक नसेल. किंबहुना, ब्रिटनच्या बाहेरही फारसं कुणास ठाऊक नसेल. खुद्द ब्रिटनमध्येसुद्धा ही व्यक्ती कुप्रसिद्ध असण्याचीच शक्यता अधिक. जॉर्ज गॅलवेची माहिती कुणी ‘विकीपीडिया’वर काढायला गेला, तर तिथे त्याला गॅलवेची खंडीभर निंदाच वाचायला मिळेल. त्याच क्षणी तो प्रस्थापितांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ असला पाहिजे, अशी दाट शंकाही येऊ लागेल.......

ट्रम्प हुकूमशहा, ओबामा नोबेल शांती पारितोषिक विजेता, जॉर्ज बुश चांगल्या मनाचा, भोळसट सार्वजनिक काका आणि बायडन प्रेमळ आजोबा इत्यादी इत्यादी...

ट्रम्पचं आज वय आहे ७७ आणि बायडनचं ८०. दोघांनाही पुढच्या निवडणुकीला उभं राहायचं आहे. तेव्हा त्यांची वयं असतील अनुक्रमे ७९ आणि ८३. दोघांनाही बुद्धिभ्रम झालेला आहे. पुढच्या निवडणुकीच्या सुमारास अमेरिका २५० वर्षांची होईल. तिच्या सध्याच्या हालचालीवरून तिला ‘म्हातारचळ’ लागला आहे, असं निदान करण्याशिवाय गत्यंतर नाही. तीच तीच तोंडाची बडबड, अवास्तव खर्च, क्षीण झालेली ताकद, गृहकलह, सूडबुद्धीने चाललेलं राजकारण.......

क्रेमलिनच्या पायऱ्यांवर चीनच्या क्षी जिनगिंपनी उदगार काढले – ‘अशी घटना शंभर वर्षांत एखाद्या वेळीच घडते. यापुढे आपल्या भवितव्याचे ‘स्वामी’ आपणच असणार आहोत!’

रशिया-चीन या नवीन सत्ताकेंद्राकडे अनेक नवीन देश आकर्षित होत आहेत. रशिया-चीन युतीपासून अफ्रिकन देशांनी सावध राहावे म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या देशांच्या नेत्यांना अमेरिकेत बोलवलं. पण अमेरिकेकडून मदतीचा कसलाही ठोस प्रस्ताव न आल्याने पाहुणे मंडळी शांतपणे घरी परतली. त्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी आपली मोहिनी अफ्रिकन देशांच्या नेत्यांवर टाकायचं ठरवलं. पण त्यांना उलट तिथे चपराकच मिळाली.......