करोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवात इब्राहिमभाईंच्या ‘पंख्यां’ना यु-ट्यूबवरच समाधान मानावं लागलं...
इब्राहिमभाईंच्या वादनाचं गारुड गेल्या ५५-६० वर्षांपासून गिरगावकरांच्या मनावर आरूढ आहे. उडत्या चालीची गाणी, काही लोकगीतं, ठेका असलेली गाणी बाजावर वाजवणं काही विशेष नाही, पण इब्राहिमभाई आरत्या, अभंग, भावगीतं, भक्तीगीतं, लावणी हे सर्व प्रकार आपल्या बाजावर वाजवतात. ‘नाच रे मोरा’, ‘गेला मोहन कुणीकडे’ ही गाणी इब्राहिमभाईंकडूनच ऐकावीत….......