‘दमवणारी दमू’ आणि ‘दमात घेणारी दमा’ असा काहीसा तिच्या (लघुरूप) नावांचा अनुभव येतो!
घरात मुलगी असेल, तर घराला परिपूर्णता येते, याचा प्रत्यय दमयंतीमुळे येतो आहे. यंदाच्या दिवाळीत हट्टानं माझ्याकडे साडीची मागणी करून पाडव्याला आणि भाऊबीजेला तिने छानच मटकून घेतलं आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ यावर माझा विश्वास असला, तरी मुलगी म्हणून तिच्या हौशी पुरवताना मुलावर थोडासा अन्याय होणार, याची जाणीव सतावते, पण मोठा भाऊ म्हणून राघवही तिच्या या कोडकौतुकात उत्साहानंदाने भाग घेतो.......