शिरसाठ म्हणतात तसं केतकर टिळकांच्या स्कूलचे शोभतात. कारण त्यांचा मंडल अहवाल, डाव्या विचारांचे कामगार, दलित, शिवाजी महाराजांना विरोध…
एक बाब मान्य केलीच पाहिजे की, केतकर मोठे संपादक आहेत, कारण त्यांनी फक्त मोठ्याच वर्तमानपत्रांत नोकरी केली आहे. दुसरी एक बाब मान्य केली पाहिजे की, केतकरांच्या ज्ञानाचा आवाका, आंतरराष्ट्रीय राजकारणाची त्यांची समज, माहिती वगैरे. त्या बाबतीत केतकर ग्रेट आहेत. प्रश्न कोणाच्या ज्ञानाचा नसतोच, प्रश्न असतो तो या ज्ञानाचं करायचं काय? हे ज्ञान कोणत्या समाजघटकांसाठी तुम्ही खर्ची करता, हा कळीचा प्रश्न असतो.......