सहदेवराव तपकिरे : दाक्षिणात्य सिनेमासृष्टीवर मराठीपणाचा झेंडा फडकवणारा रंगभूषाकार
काळाचा महिमा असा होता की, मद्रासचा शेवटचा निरोप घेण्याच्या एक दिवस आधी वासन यांचे निधन झाले. आयुष्याच्या सर्व महत्त्वाच्या प्रसंगांत सहदेवरावांना वासन यांनी केवळ आधारच दिला नाही, तर सन्मानाने वागवले होते. तोच आधारवड निघून गेल्यानंतर सहदेवरावांचा मद्रास सोडण्याचा निर्धार अजून पक्का झाला. त्या वेळी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, त्याला मद्रास सिनेमाजगतातले बहुतेक सर्व प्रमुख कलावंत हजर होते.......