रंगांचा मायावी खेळ, रंगांची अनंत रूपे जशी प्रकाशातून स्त्रवतात, तशीच ती कालिदासाच्या साहित्यातही प्रकट होताना दिसतात!
कालिदासाचा रंगांचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या विविध भावभावनांचा, त्यांच्या प्रतीकात्मक अर्थाचा, दोनहून अधिक रंगांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या वेगळ्याच रंगछटांचा, विविध रंगांच्या तीव्रतेचा, त्यांच्या उजळ, मध्यम व गडद छटांचा, त्यांच्या पोताचाही अभ्यास एखाद्या चित्रकाराच्या तोलामोलाचा आहे. त्याच्या साहित्यकृतींतील रंग मोहिनी घालतात, त्यातल्या रंगछटा भूल पाडतात. कालिदासाला रंगांचं अंतरंग चांगलं उमजलेलं होतं.......