जिथे जिथे ‘जात’ नष्ट करण्याचा लढा चाललेला असेल, तिथे तिथे तुम्ही मारी सेल्वाराजच्या ‘कर्णन’ला भेटाल!
हिंसाचाराचे चित्रण केल्याबद्दल या चित्रपटावर टीका झाली आहे. मात्र, धनुषच्या नायकत्वाने एक प्रभावी उत्तरदेखील प्रदान केले आहे. एकाच पात्राच्या दोन भिन्न भिन्न आवृत्त्यांची कल्पना करणे अशक्य आहे. एक गोरा, उजळ, सामर्थ्यशाली, तेज:पुंज आणि वजनदार सोन्याचे आभूषण ल्यालेला आणि संस्कृत ‘महाभारता’ला अनुरूप असणारा. आणि दुसरा बारीक शरीरयष्टी असणारा, काळ्या रंगाचा, अंगावर सुंदर आभूषणे नसणारा, दैवी चिलखत नसणारा, अगदी कसलीच ज.......