मोदीकाळ : चार वर्षांचा लेखाजोखा
लोकांना कुणाला तरी धडा शिकवण्यात रस आहे. ते काम हे सरकार या ना त्या प्रकारे करून दाखवत आहे. हा त्यांचा सूडाचा प्रवास वेळीच रोखला गेला नाही, तर तो अव्याहत सुरूच राहील. चार वर्षे झाली. पाचव्या वर्षी पुढल्या पाच वर्षांची ‘सोय’ करण्यासाठी सूडाचा भेसूर अग्नी पसरवण्याच्या तयारीत मोदी सरकार आणि त्यांचे सैन्य असू शकते, असे या चार वर्षांच्या प्रवासावरून म्हणता येते. चार वर्षांनंतरही देशवासी सावध झाले नाहीत तर नशीब देशाचे.......