क्रांतिकारक बसवन्ना हे बाराव्या शतकातले आपले ‘कार्ल मार्क्स’च म्हणावे लागतील…
बसवन्ना यांनी समतेची परंपरा सांगणारा विलक्षण आणि क्रांतिकारक प्रयोग एका अत्यंत सनातनी अशा समाजात बाराव्या शतकात केला. आपण कुठला तरी नवा धर्म स्थापन करत आहोत, असा अभिनवेश त्यांच्याकडे नव्हता. देव, वेद, पुराण, पुनर्जन्म, कर्मकांड, जात, लिंगभेद, अनिष्ट रूढी-परंपरा आणि वैदिक सनातन धर्माचा त्यांनी कायम विरोध केला. श्रम आणि कष्टाला प्राधान्य दिले. त्यांच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी माणूस होता.......