लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. सृजनाचा व्यायाम
‘माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात, हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय-काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्या अर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकाने ‘यकृत’, ‘हृदय’ नावाची नाटके लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’.......