गांधीजी आज एका दीपस्तंभासारखे वादळवाऱ्यात भरकटलेल्या तारूस मार्गदर्शक ठरत आहेत!
काळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसे गांधीजींचे विचार अधिकाधिक उपयोगी असल्याचे प्रत्ययास येत आहे. वाढती व्यापार-स्पर्धा, वाढता भ्रष्टाचार, वाढता जाती-विद्वेष, रोडावणारी आरोग्य व शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक अस्वच्छता, कोसळणारे उद्योगधंदे, ढासळणारी नैतिकता, बकाल होणारी शहरे, ओस पडणारी गावं, मावळता पर्यावरण विवेक आणि सरती नाती-गोती, या पार्श्वभूमीवर गांधीजी एका दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहेत.......